Breaking News

ओवे कॅम्पला जोडणार्या मुख्य रस्त्याची दूरवस्था

त्वरित डांबरीकरण करण्याची भाजप कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिका हद्दीमधील ओवे कॅम्प गावाला जोडणार्‍या मुख्य रस्त्याचे त्वरित कायमस्वरूपी टिकेल असे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करावे तसेच पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून येणार्‍या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप व गटरांची व्यवस्थाही योग्य प्रकारे करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांतर्फे विशेष कार्यकारी अधिकारी व भाजप कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांना निवेदन दिले आहे.

या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. येथून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना दवाखान्यात घेऊन जाताना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावाला जोडणारा हा एकमेव मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था पाहता या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

ओवे कॅम्प रस्त्यावर दोन-अडीच फु टांचे खड्डे पडले आहेत. या मुख्य रस्त्यावर डेब्रिजचे साम्राज्य पसरले आहे. येथे हे डेब्रिज टाकणारे शोधूनही सापडत नाहीत. सिडको प्रशासनाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही योग्य ती दखल घेतली जात नाही.

-रामचंद्र जाधव, भाजप कार्यकर्ते

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply