Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक अपघातात एक ठार

खोपोली : प्रतिनिधी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने शनिवारी (दि. 6) सकाळी मुंबईकडे चाललेला ट्रक बोरघाटातील सीआरआयएल कंपनीजवळ नाल्यात कोसळला. या अपघातात वाहनचालक ट्रकखाली चिरडून ठार झाला,  तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात सीआरआयएल कंपनीजवळ शनिवारी सकाळी 8.45वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईकडे चाललेला ट्रक महामार्गाजवळच्या नाल्यात कोसळला. अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस. आयआरबी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात वाहन चालक ट्रकखाली अडकला होता. आयआरबी कंपनीच्या हायड्रामार्फत ट्रक बाजूस करून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply