Breaking News

पनवेलमध्ये धान्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

सर्व गणेश भक्तांना हा सण गोड व्हावा म्हणून दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबियांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले.

खारघर, सेक्टर-12 येथील शेकडो गरजू आणि दैनंदिन मजुरी करणार्‍या गणेशभक्तांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजप खारघरच्या विविध सेलचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते तसेच भाजप खारघर-तळोजा मंडल उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र मांजरेकर (मामा), खारघर तळोजा मंडल सरचिटणीस दिपक शिंदे आणि संदीप कासार उपस्थित होते. या वेळी अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व ह्या स्तुत्य सामाजिक कार्याचे कौतुक केले.

पनवेल : संपुर्ण जगाला कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपमार्फत जांभिवली गावात अन्नधान्य वाटप करण्यात आले. या वेळी जांभिवली गावातील पनवेल तालुका महिला सरचिटणीस शिल्पा म्हात्रे, आपटा विभागिय युवा मोर्चाअध्यक्षकल्पेश कोंडीलकर, सरपंच रिया रवींद्र कोंडीलकर, बुथ अध्यक्ष काळुराम माळी, ग्रामपंचायत सदस्य अनिता अनंता कोंडीलकर, सदस्य अमित कोंडीलकर, रवींद्र कोंडीलकर, क्रुष्णा कोंडीलकर, बळीराम कोंडीलकर, दीलीप टकले, चंदर कोंडीलकर, संजय कोंडीलकर, रूपेश कोंडीलकर, जगदीश म्हस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि तालुका भाजपच्या वतीने 200 रिक्षाचालक बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, अर्जुन साबळे, अशोक विखारे, संतोष प्रबलकर, आतिश साबळे, मयूर साबळे आदी उपस्थित होते.

शेलघर (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजप यांच्या वतीने 60 हजार कुटुंबीयांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरजू गणेशभक्तांना धान्याचे वाटप केले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply