विल्यमसन करणार नेतृत्व
हैदराबाद ः वृत्तसंस्था
आयपीएलच्या 2021च्या हंगामाच्या मध्यात सनरायझर्स हैदराबादने मोठा बदल केला आहे. नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरला हटवून संघाने केन विल्यमसनला कर्णधारपद दिले आहे. हैदराबादच्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केन कर्णधार असेल. सनरायझर्स हैदराबादने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
आयपीएलच्या आगामी सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असेल. उद्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यांसाठी ओव्हरसीज कॉम्बिनेशनची जागा बदलण्याचा निर्णयही संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. व्यवस्थापन डेव्हिड वॉर्नरबद्दल आदर व्यक्त करते. मागील वर्षांत वॉर्नरचादेखील प्रभाव राहिला आहे. उर्वरित सामन्यांमध्ये वॉर्नर मैदानाच्या आत आणि बाहेर संघाला पाठिंबा देत राहिल, असे हैदराबादने ट्विटरद्वारे सांगितले.