Breaking News

सेल्फीच्या नादात जीव गमावणार्या तरुणीस जीवदान

रेवदंडा : प्रतिनिधी

साळाव पुलावरून सेल्फी काढत असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा तोल जाऊन पाय घसरून तरुणी साळाव पुलावरून कुंडलिका समुद्र खाडीत पडली. भरतीची वेळ असल्याने ती आग्रावकडे दिशेकडे वाहून गेली, सुदैवाने ती वाहून जात असतानाच आग्राव मधील कोळी बांधवाचे नजरेस आली, आणि तीचे प्राण वाचले. रेवदंडा पोलीस ठाणेमधील बडीकॉप महिला अधिकारी आयपिएन अभियंती मोकळ यांनी प्रयत्नाची शिकस्त करून त्या मुलीस जीवनदान दिले.

रेवदंडा पोलीस ठाणे येथे ठाणे अमंलदार बडी कॉप अधिकारी आयपिएन 147 अभियंती मोकळ बुधवारी (दि. 27) डयुटीवर असताना आग्रावमधील सरदार नावाच्या ग्रामस्थांनी अडीच वाजण्याच्या सुमारास फोन करून सांगितले की, एक 23 वर्षीय युवती आग्राव जेटी येथे पाण्यात वाहत आलेली आहे. तिला पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून तिला श्वास घेण्यास त्रास होत असून ती थरथरत आहे. तिला त्वरेने रूग्णालयांत नेणे गरजेेचे असून त्वरेन पोलीस मदतीसाठी पाठवावे. ही माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक चिमडा, बडी कॉप महिला अधिकारी आयपिएन अभियंती मोकळ, आयपीएन भोईर, एचसी शिंदे, पिसी मेहत्तर, असे त्वरेने घटनास्थळी दाखल झाले, त्या युवतीस लागलीच सरकारी वाहनाने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केद्रात उपचारासाठी दाखल केले. ती सुस्थितीत आल्यावर तिची विचारपुस केल्यावर तिने नांदगाव कोळीवाडा येथील रहिवाशी असून तिचे नाव प्राची सदानंद रावजी वय 23 वर्ष असल्याचे सांगितले. साळाव पुलावर स्वतंःचे मोबाइल वरून सेल्फी फोटो काढत असताना तिचा तोल गेला, व पाय घसरून समुद्रात पाण्यात पडली असल्याचे सांगितले.

रेवदंडा बडी कॉप महिला अधिकारी आयपिएन अभियंती मोकळ हिने तिचे पाल्याशी संपर्क केला व त्यांस रेवदंडा पोलिस ठाणे येथे बोलावून घेऊन तिच्या पाल्याकडे सुखरूप देण्यात आले. तिच्या कुटूंबियाने रेवदंडा पोलीस दलाचे विशेष आभार व्यक्त केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply