Breaking News

कबड्डी स्पर्धेत उडदवणे संघ प्रथम

रोहे : प्रतिनिधी

रोहे तालुक्यातील रोठ खुर्द येथे जय वाघेश्वर क्रीडा मंडळ आयोजित सरपंच चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा काळभैरव उडदवणे संघाने जिंकली. गणेश क्लब उरण हा संघ उपविजेता ठरला.

रायगड जिल्हा व रोहा तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत 32 संघ सहभागी झाले होते. तृतीय क्रमांक तळाघर रोहा आणि चतुर्थ क्रमांक नवतरुण स्पोर्ट्स करावी या संघाने मिळविला. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून दीपक कासारे (उडदवणे), उत्कृष्ट चढाईपटू जयवंत कांबळे (तळाघर), उत्कृष्ट पकडपटू मयूर कदम (उरण) यांची निवड करण्यात आली.

बक्षीस वितरण समारंभास सरपंच दिनेश मोरे, देशपांडे, चिंतामणी गोडबोले, विवेक मोरे, प्रवीण मोरे, रूपेश मोरे, सचिन मोरे, दत्ता मोरे, सुजय फुलारे, प्रसाद मोरे, प्रदीप मोरे, राजा मोरे, राजेश मोरे, संदीप मोरे, अतिष ढमाले, राकेश मोरे, किरण मोरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.

स्पर्धेदरम्यान तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष विजय मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, सुरेश मगर, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, सरपंच रामा म्हात्रे, मोरेश्वर कोलाटकर, माजी तालुकाप्रमुख विष्णू लोखंडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, सरपंच सतीश भगत, विठ्ठल मोरे, घनशाम कराळे आदींनी सदिच्छा भेट दिली.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply