पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 17मध्ये नवीन पनवेल सेक्टर 12, 13, 17, व 18 येथे बुधवारी (दि. 9) झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचले होते. वार्यामुळे सेक्टर 13 येथे झाड कोसळले होते. याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तसेच अॅड. जितेंद्र वाघमारे यांनी तत्परता दाखविली. वाघमारे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता श्री. मुलानी, अभियंता ओम खरे, गौरव हिंगणे यांना बोलावून या ठिकाणच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. सिडकोच्या गलथान कारभारामुळे अॅड. वृषाली वाघमारे यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. सिडकोचे नालेसफाईचे काम योग्यरीत्या झाले नाही हे निदर्शनास आणून दिले. यानंतर त्वरित यंत्रणा कामाला लागली व ते झाड उचलण्यासाठी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला कळवले आणि या कामाला सुरुवात झाली. या वेळी सेक्टर 12 येथील दक्ष नागरिक सचिन देसाई, अंकित सिंग उपस्थित होते.