Breaking News

पेण संघाने जिंकला माजी सरपंच चषक

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सोनारी येथे महेश नरेश कडू यांच्या नावाने आयोजित माजी सरपंच चषक गावदेवी कळवा (पेण) संघाने पटकाविला आहे. आर. पी. जसखार संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. त्यात पेण संघाने अंतिमतः बाजी मारली. त्यांना एक लाख 77 हजार 777 रुपये, पारितोषिक  व चांदीचा दीड किलो वजनाचा सुंदर व आकर्षक चषक देण्यात आला. तृतीय  क्रमांक साईनाथ करंजा संघाने प्राप्त केला. विजेत्या पेण संघाला एक लाख 77 हजार 777 रुपये व चांदीचा आकर्षक चषक देण्यात आला. द्वितीय व तृतीय संघांनाही पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचा मालिकावीर सुशांत मोकल ठरला. त्याच्यासह उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व अन्य चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंनाही इनाम देऊन गौरविण्यात आले.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply