तिघांचा मृत्यू; 130 जणांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 31) कोरोनाचे 225 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 100 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 55 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 1पनवेल मातोश्री ओल्डेज होम, कामोठे सेक्टर 6 ईस्ट अँड अपार्टमेंट आणि कळंबोली सेक्टर 1 ई साईबाबा आशीर्वाद सोसायटीमधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2053 झाली आहे. कामोठेमध्ये 43 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2510 झाली आहे. खारघरमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2379 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 27 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2183 झाली आहे. पनवेलमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2086 झाली आहे. तळोजामध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 611 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 11882 रुग्ण झाले असून 10183 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.14 टक्के आहे. 1354 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 285 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 289 जण बाधित
नवी मुंबई : सोमवारी 289 नवे रुग्ण आढळले तर 391 जण कोरोनामुक्त झाले आहे. सोमवारी सात जणांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी बेलापूर 36, नेरुळ 55, वाशी 70, तुर्भे 34, कोपरखैरणे 45, घणसोली 17, ऐरोली 29, दिघा तीन अशी आहे.
उरण तालुक्यात नऊ जणांना लागण
उरण : उरण तालुक्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह नऊ रुग्ण आढळले व 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये जसखार दोन, चीर्ले, जासई, भेंडखळ, चाणजे, नवापाडा करंजा, पागोटे, जेएनपीटी टाऊनशिप येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1363 झाली आहे. त्यातील 1124 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 174 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 65 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
महाडमध्ये कोरोनाचे चार रुग्ण
महाड : महाड तालुक्यात सोमवारी कोरोनाच्या चार नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तिघांनी कोरोनावर मात केली आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये आकांक्षा अपार्टमेंट काकरतळे 45 वर्षीय पुरुष, सुदर्शन कॉलनी 53 वर्षीय पुरुष, नांगलवाडी 70 वर्षीय स्त्री, नांगाव 33 वर्षीय स्त्री यांचा समावेश आहे. महाड मध्ये 133 रुग्णांवर कोरोनाचे उपचार होत आहेत तर 776 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 953 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.