Breaking News

मुलीचा सौदा केल्याप्रकरणी आई पोलिसांच्या ताब्यात

खारघर : प्रतिनिधी

स्वतःचा मुलीचा सौदा करणार्‍या महिलेस नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून मुलीस महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. हि कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांच्या पथकाने केली आहे .   

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी नवी मुंबई परिसरात आढळणार्‍या बेकायदेशीर अवैध कृत्यांना आळा घालण्याच्या सूचना दिलेल्या असल्यामुळे गुन्हे शाखा नेहमी तत्पर असते. दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त,  प्रवीणकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्दर्शनाखाली काम करणारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यास शुक्रवारी (दि. 28) मीरा-भाईंदर येथे राहणार्‍या एका महिलेची अठरा वर्षाची मुलगी असून  यापूर्वी कोणत्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध झालेला नाही, तिच्याशी प्रथम संभोग करू इच्छिणार्‍या ग्राहकाच्या शोधात असून त्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करीत असल्याची मार्फत खबर्‍या मार्फत खबर मिळाली होती. अर्जुन गरड यांनी बनावट ग्राहक पाठवून सदर महिलेबरोबर बोलणी करण्यास सांगितले असता, तिने मुलीच्या प्रथम शरीर संभोगासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. हा सौदा  एक लाख वीस हजार रुपयांत  ठरविण्यात आला.

सोमवारी (दि. 31) पोलिसाच्या बनावट ग्राहकाने शिरवणे गाव नेरूळ येथील हॉटेल कोहिनुर पॅलेस येथे सदर महिलेचा सांगण्यावरून एक रूम बुक केली. सायंकाळी पाचच्या सुमारास सदर महिला हॉटेलमध्ये तिच्या मुलीला मीरा-भाईंदर येथून इंडिका कारने घेऊन आली. या ठिकाणी महिलेबरोबर बनावट ग्राहकाने बोलणे करून आईच्या सांगण्याप्रमाणे मुलीस घेऊन रूम मध्ये गेला. रूममध्ये मुलगी वेश्यागमनासाठी तयार होत असताना बनावट ग्राहकाने पोलिसांना मोबाइलवरून ठरल्याप्रमाणे इशारा करताच, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांचे पथकाने, पंचासह सदर ठिकाणी छापा टाकून पीडित तरुणीच्या आईला ताब्यात घेवून नेरुळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून तिला अटक केली आणि पिडित मुलीस सुधारगृहामध्ये पाठविण्यात आलेले आहे.या पथकात  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिता भोर यांच्यासह पथकातील इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply