Breaking News

उरण मोरा ते भाऊचा धक्का जलवाहतूक पुन्हा सुरू

उरण : वार्ताहर

लॉकडाऊन झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आत्या होत्या. त्याच अनुषंगाने उरणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा ही प्रवासी जलवाहतूक (लॉंचसेवा) गुरुवार (दि. 3) पासून सुरू करण्यात आली आहे.

मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) ही प्रवासी  जलवाहतूक सेवेला एकेरी भाडे 55 रुपये इतके असून या प्रवासास एक तास वेळ लागतो. वाहतूक बंद असल्याने उरण वासियांना मुंबई येथे जाण्यासाठी उरण ते नवी मुंबई पुढे मुंबई येथे या मार्गाने जावे लागत होते. मुंबई ला पोहचण्यासाठी दोन ते तीन तास प्रवासस लागत असे. त्यामुळे वेळ व पैसा या दोघांचा अपव्यय होत असे. त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावे लागत होते.जलवाहतूक सेवा सुरु झाल्याने मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) फक्त एक तासात मुंबई येथे पोहचता येत असल्याने नागरिकांचा (प्रवाशांचा) वेळ व पैसा वाचला त्यामुळे प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  स्वतंत्र्य पूर्व काळापासून मोरा (उरण) ते भाऊचा धक्का (मुंबई) ही जलवाहतूक सेवा सुरु आहे. ट्राफिक जाम रस्ते खराब  आणि वेळेची बचत यामुळे उरण तालुक्यातील प्रामुख्याने उरण शहर आणि उरण तालुक्यातील पश्चिम भागातील हजारो लोक मुंबईला जाण्यासाठी या जलवाहतूक सेवेचा वापर करतात. अनेक वर्षे ही सेवा अखंडितपणे सुरू आहे. मात्र, उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाची असलेली ही जलप्रवास सेवा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली आहे. सुरुवातीच्या काळात दिवसाला सहा फेर्‍यापर्यंत ही सेवा मर्यादित ठेवण्यात आली आहे.

प्रवाशांची गरज ओळखून फेर्‍या वाढविण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, प्रवाशांनी मास्क लावणे तसेच वेळोवेळी बसण्याची व्यवस्था सॅनिटाईज करण्याची काळजी लॉंच चालकाने घ्यायची आहे. लॉंचमध्ये गर्दी होऊ नये यासाठी निम्म्या प्रवाशांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

-पी. बी. पवार, बंदराचे निरीक्षक

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply