Breaking News

वाईनबाबतचा निर्णय मागे घ्या! – बंडातात्या कराडकर

राज्य सरकारविरोधात आंदोलन

सातारा : प्रतिनिधी
राज्य सरकारने सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाला ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला आहे. सातर्‍यात बंडातात्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले.
या वेळी बोलताना बंडातात्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. अन्यथा राज्यभर ऊग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
बंडातात्या म्हणाले की, विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचे आंदोलन करता आले नसते, पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारूविक्रीचा हा भयंकर असा निर्णय लादला आहे. त्यावर आम्ही नाराज आहोत.
आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रूप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल, असेही बंडातात्या म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply