नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांचा पुढाकार
खारघर ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका व प्रभाग 5मधील नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने डॉक्टर्स दिनानिमित्त खारघरमधील फणसवाडी व चाफेवाडीतील आदिवासी महिला, पुरुष व मुले यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व आहाराचे महत्त्व समजावून सांगितले.
दैनंदिन जीवनात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक सल्ले दिले जातात. कोरोना महामारीच्या काळात तर डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच ठरले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनी पाहिले. प्रत्येक डॉक्टर आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरवतो याची खात्री करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.
पावसाळ्यात अतिसार झाल्यावर काय काळजी घ्यावी याबद्दल आदिवासी बांधवांना माहिती दिली. ओआरअस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.