उरण : वार्ताहर
साखरचौथनिमित्त गौरा गणपतीचे शनिवारी आगमन झालेले असून दिड दिवसांच्या गणपतींना भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील दांडा येथील नवयुग क्रीडा मंडळ दांडा सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी आपल्या मंडळाची गणेशमूर्ती दांडा समुद्र किनारी विसर्जन केली. विसर्जन करताना सोशल डिस्टन्सिंग पळण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून सर्वांनी आनंदाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. या वेळी दांडा गावातील सर्व ग्रामस्थ, नवयुग क्रीडा मंडळ सदस्य आदी उपस्थित होते.