Breaking News

थोर पुरुषांची शिकवण आचरणात आणा -नगराध्यक्षा प्रीतम पाटील

पेण : प्रतिनिधी

थोर पुरुषांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण केल्यास समाजात एकोपा व शांतता निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांचा आदर्श आपण अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नुकतेच येथे केले. पेण नगर परिषद हद्दीतील संत शिरोमणी रोहिदासनगर येथील हायमास्ट दिव्याचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार नुकताच नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीसाठी यापुढे नगर परिषदेतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक भरत साळवी यांनी केले. नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका तेजस्विनी नेने, चर्मकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू तळकर, प्रा. डी. के. बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती शहेनाज मुजावर, अजय क्षीरसागर, भास्कर पाटील, भरत साळवी आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश भोईर, कविता भोईर, धनंजय साळवी, रेवती भोईर, रितेश भोईर, रश्मी गायकवाड, गणेश पुगावकर, दिनेश साळवी, प्रमिला साळवी यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी बैठका

महायुतीच्या नेत्यांनी केले मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Leave a Reply