Breaking News

विद्यार्थ्यांनी केला ऑनलाइन टीचर्स डे उत्साहात साजरा

उरण : वार्ताहर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण ह्यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस ’टीचर्स डे’म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी शाळा कॉलेजांमध्ये मोठ्या वर्गातील विद्यार्थी हे छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन शिकवित असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील यूईस स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या दहावी अणि बारावीच्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, दहावीच्या विध्यार्थ्यांनी इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना तर बारावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना सिस्को वेबेक्स व डिंगटॉक लाईट अ‍ॅपद्वारे ऑनलाइन शिकवून ’टीचर्स डे’ साजरा केला. माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सोनाली म्हात्रे व प्राचार्या सिमरन दहिया व इतर शिक्षक ह्या कार्यक्रमासाठी ऑनलाइन उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply