Breaking News

एक्सप्रेस वेवर तीन अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

खोपोली : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान खंडाळा घाट ते भाताण बोगदा या अंतरात तीन वेगवेगळे अपघात घडले. यात एकूण पाच जण किरकोळ तर एक जण गंभीर जखमी आहेत. तातडीने मदत मिळाल्याने जिवीत हानी झाली नाही.

पहिला अपघात रविवारी संध्याकाळी आडोशी उतारावरील मुंबई लेन वर घडला यात भरधाव कार सुरक्षा कठड्यावर आदळली. यात कार मधील दोघे जण किरकोळ जखमी झालेत. दुसरा अपघात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास किमी 37.5 मुंबई लेन वर घडला. यात माल वाहतूक टेम्पो उलटला. या अपघातात चालक वाहनमध्ये अडकून पडला होता. मात्र  महामार्ग पोलीस व आयआरबी आपत्कालीन मदत पथकाने तातडीने मदत केल्याने अडकले चालक सुरजित पांडा (रा. नवी मुंबई) याला सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आले. तिसरा अपघात रात्री साडे अकरा  वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस वे किमी 37 वर पुणे लेन वर घडला. यात मालवाहुक ट्रक सुरक्षा कठड्यावर धडकून उलटला. यात ही चालक गंभीर तर  अन्य एक जण किरकोळ जखमी झाला.

महामार्गावरील आपत्कालीन पथकाने तातडीने मदत करून जखमी चालकास लोकमान्य टिळक हॉस्पिटल निगडी येथे दाखल केले आहे. तिन्ही अपघातात महामार्ग पोलीस व आयआरबी पथकाकडून  तातडीने मदत मिळाल्याने जीवित हानी झाली नाही.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply