Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला

ऑइल पसरून वाहतूक ठप्प

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर उलटून आतील ऑइल रस्त्यावर पसरल्याची घटना सोमवारी (दि. 7) दुपारी घडली.

अपघाताची शक्यता व दुर्घटना रोखण्यासाठी तसेच सांडलेले ऑइल भरून माती टाकण्यासाठी आयआरबी व वाहतूक पोलिसांनी मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंईच्या दिशेने जाणारा ऑइल टँकर खोपोली-खालापूरदरम्यान आडोशी बोगदा या ठिकाणी उलटला. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एक्स्प्रेस वेर्ववरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांविण्यात आली. खाजगी लहान वाहने वलवण लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली, तर मोठी अवजड वाहने थांविण्यात आली. सुमारे तीन तासापासून वाहतुक खोळंल्याने मुंबई लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

फायर ब्रिगेडच्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्याचे तसेच ऑइलवर माती टाकत चिकटपणा काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. रस्ता सफाईकामी आयआरबीच्या जोडीला खोपोली अग्निशमन दलाने परिश्रम घेतले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply