Breaking News

रिया चक्रवर्तीला अखेर ‘एनसीबी’कडून अटक

मुंबई ः प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली मंगळवारी (दि. 8) अटक करण्यात आली. अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्याची चौकशी केल्यानंतर यात रिया चक्रवर्तीचे नाव समोर आले. या प्रकरणात तिची चौकशी सुरू होती. चौकशीच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी रियाला अखेर अटक करण्यात आली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. एनसीबीच्या चौकशीत तिने ड्रग्ज घेतल्याचे मान्य केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत तपासासाठी आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने 10 दिवसांत रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंतसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले. त्यानंतर आता एनसीबीकडून रियाच्या अटकेची मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply