Breaking News

पनवेल मनपा उचलणार ‘त्यांच्या’अंत्यविधीचा खर्च

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा गाठला आहे. यापैकी 1850 च्या आसपास विद्यमान कोरोना रुग्ण आहेत. उर्वरित 11,500 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा 324 वर गेला आहे. कोरोनामध्ये मृत पावणार्‍या रुग्णांचा आकडा वाढत आहे. अनेकांनी कोविड आजारातील मृतांवर मोफत अंत्यविधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने कोविड रुग्णांवर पालिकेच्या माध्यमातून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्यविधीसाठी गॅस शवदाहिनीचा वापर केल्यास 2500 तर लाकडांचा वापर केल्यास पाच हजार रुपयांचा खर्च येतो. हा खर्च पालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे. सध्याच्या घडीला पोदी स्मशानभूमी व अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी कोविड रुग्णांवर अंत्यविधी केला जातो.

कोविडने मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीचा खर्च पालिकेमार्फत करण्याची मागणी आमच्याकडे येत होती. या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

-सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply