Breaking News

चिरनेरच्या जंगलात होतेय गुरांची कत्तल

चिरनेर : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यात गुरे चोरणार्‍या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्‍यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. या सुलतानी संकटाने शेतकरी राजा भयभीत व गलितगात्र झाला आहे. चिरनेरच्या जंगलात या अज्ञात कसायांचा गुरे कत्तलीचा रात्रीचा क्रूर खेळ उघड झाला आहे.उरण तालुक्यात शिल्लक असलेल्या पशुधनावर कसायांची वक्र दृष्टी पडली आहे. रस्त्यावर निवांत बसलेल्या अथवा जंगलात चरायला गेलेल्या गाई, बैलांना बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन अथवा स्प्रे मारून चोरटे बिनधास्त गुरे चोरीत आहेत. काही दिवसांपूर्वी उरण-भवरा येतून रात्री एका गाईला बेशुद्ध करून इनोव्हा गाडीत टाकून कासायांनी पळवून नेले होते. त्यांना विरोध करणार्‍या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी आपले काम फत्ते केले होते. या गुरे चोरीसाठी रात्री भिवंडी, पनवेल, मुंब्रा येथील कसाई आपल्या वाहनांसह उरणमध्ये दाखल होतात. चिरनेरच्या बापूजी देव जंगल परिसरात दोन दिवसांपूर्वी रस्त्याकडेला गाई, बैलांची क्रूर कत्तल केल्याचे निदर्शनास आले आहे. या जागेवर कापलेल्या गाई, बैलांच्या रक्ताचे थारोळे व त्यांना पकडण्यासाठी वापरलेले दोरखंड इतरस्त्र पडलेले दिसून येत आहेत. जंगलात चरायला गेलेल्या जनावरांना जंगलातील जाळींमध्ये फास लावून पकडले जाते. जनावरे पकडल्यावर दलाल त्यांच्या संबंधित कसायांना संपर्क साधून बोलावतात आणि गुरांची जंगलातच कत्तल करून त्याची विल्हेवाट लावून जनावरांच्या केलेल्या तुकडे वाहनातून बिनबोभाटपणे इच्छित स्थळी नेले जातात.याबाबत पोलीस यंत्रणेला वारंवार कल्पना देऊनही या गुरे चोरणार्‍या टोळीस पकडण्यासाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले आहेत. हे गुरेचोर कसाई विशेषतः मुस्लिम समाजाचे शस्त्रधारी युवक असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. मात्र भीतीपोटी कोणीही या क्रूर कसायांना विरोध केला नाही. सध्या गाई, बैलांच्या किंमती खूप वाढल्या असून गुरे चोरीला गेल्याने तालुक्यातील पशुपालक भयभीत व गलितगात्र झाले आहेत. परिणामतः या गुरे चोरणार्‍या टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी पधुपालकांनी केली असून न पेक्षा पशुपालक उग्र आंदोलनाची तयारी करीत आहेत.

उरण तालुक्यातील गायी, गुरांची होणारी चोरी व कत्तली हा चिंताजनक विषय असून शेतकरी वर्गासाठी हे मोठे संकट आहे.गाई गुरे हे नैसर्गिक समतोल राखणारा घटक असल्याने त्याची चोरी करणार्‍या चोरांचा बंदोबस्त करावा अन्यथा तालुक्यातील निसर्गमित्र आंदोलन उभारतील

-आनंद मढवी, अध्यक्ष, निसर्ग संवर्धन संस्था

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply