मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील खारघर येथील सत्याग्रह महाविदयालयाच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये संविधानाचे उद्देशिका असलेले संविधान रथ हे मोठे आकर्षण होतं.
या रॅली खारघर शहरातून सेंन्ट्रलपार्क मेट्रो रेल्वे स्टेशन जवळील सत्याग्रह मैदानात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये माजी जिल्हा न्यायधीश यशवंत चावरे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिकेची सर्व विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. या वेळी संविधानाचा विजय असो ! सत्यमेव जयते ! संविधान दिनाच्या हार्दिक शूभेच्छा ! संविधानाची कास धरू, विषमता नष्ट करू ! अशी विविध घोषवाक्य असलेले फलक रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हाती होते. या रैलीत भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रदान करत असल्याचे तैल चित्र संविधान रथाच्या मध्यभागी लावण्यात आले होते. प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्राचार्या नेहा राणे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या रॅलीमध्ये सिध्दार्थ मल्टिपरपज् रेसिडेन्शल हायस्कूल, डॉ. जी. के. डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल, अजिंठा इंटरनॅशनल स्कूल, सत्याग्रह महाविदयालय, सत्याग्रह अध्यापक महाविदयालय यातील विदयार्थी, शिक्षक, पालक संविधान प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माजी न्यायाधीश यशवंत चावरे, प्राचार्य स्नेहा राणे प्रजासत्ताक विद्यार्थी परिषदेचे किशोर पाटील, राजरत्न डोंगरगावकर, नरसिंग कांबळे, अॅड. किशोर कांबळे, एम एल सूर्यवंशी, प्रा. एलोरा मित्रा, प्रा. संगिता जोगदंड, डॉ. निधी अग्रवाल, प्रा. सुनिता वानखेडे ,नेहा कपोटे आदी उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …