Breaking News

रायगडात 16 रुग्णांचा मृत्यू; 648 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 648 नव्या रुग्णांची नोंद सोमवारी (दि. 14) झाली, तर दिवसभरात 600 रुग्ण बरे झाले. मयत रुग्णांमध्ये अलिबाग तालुक्यातील पाच, पनवेल व कर्जत प्रत्येकी तीन, रोहा दोन आणि खालापूर, पेण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 284, अलिबाग 77, रोहा 71, माणगाव 61, पेण 58, खालापूर 35, कर्जत 27, महाड 18, उरण सहा, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी चार, पोलादपूर दोन आणि तळा तालुक्यातील एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 37,773 व मृतांची संख्या 1022 झाली आहे. जिल्ह्यात 30,159 जण कोरोनामुक्त झाल्याने 6592 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply