पनवेल : रामप्रहर वृत्त
भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर मोर्चाच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमधील रुग्णालय, तसेच गणेश नगर कुष्ठरोगी वसाहत, आदिवासीवाडी येथे शुक्रवारी (दि. 18) फळांचे वाटप करण्यात आले.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आणि गरीब, वंचित, दलित, आदिवासी व शेतकर्यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध समाजोपयोगी कार्यक्रम होत आहेत. त्या अंतर्गत पनवेल शहर भाजप मंडलाच्या वतीने शहरातील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, डॉ. गुणे रुग्णालय, डॉ. पटवर्धन रुग्णालय, तसेच एचओसी कॉलनीच्या मागील कातकरवाडी, पोदी क्रमांक 2 कातकरीवाडी आदिवासीवाडी आणि कुष्ठरुग्ण वसाहतीमधील बंधू भगिनींना फळवाटप करण्यात आले. पनवेल शहर मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, वैद्यकीय सेल शहर मंडल संयोजिका ज्योती देशमाने, अशोक आंबेकर, महिला मोर्चा सदस्य मयुरी उनडकर, शैला आंबेकर यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स पाळून कार्यक्रम झाला.