
पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने शुक्रवारी पनवेल, नवीन पनवेल खांदा कॉलनी येथील हातावर पोट असलेल्या कामगारांच्या लहान मुलांना खाऊ व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर कानडे, युवा कार्यकर्ते रमेश शिंदे आदी उपस्थित होते.