Breaking News

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्यामुळे ड्रेनेज लाईनची समस्या निकाली

पनवेल : वार्ताहर

शहरातील चिंतामणी हॉल समोरची ड्रेनेज लाइन दबली गेली होती. चेंबरचा शोध घेऊन तो ड्रेनेज लाईनशी जोडण्यात आला. यासाठी प्रभागातील नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकाकडे सतत पाठपुरावा करून शुक्रवारी (दि. 18) प्रत्यक्ष उभे राहून काम करून घेतले.शिवमंदिरसमोर ड्रेनेज चेंबरच्या बाजूने खड्डा पडला होता. त्याची पाहणी स्थानिक नगरसेवक विक्रांत पाटील यांनी करून या संबंधी पनवेल महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांना बोलावून काम करून घेतले व खड्डा बुजविण्यास सांगितले. त्यामुळे प्रभागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply