Breaking News

रायगड जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य

देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातही भाजपच्या वतीने ठिकठिकाणी सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत.

पेणमध्ये वृक्षारोपण, फळवाटप

पेण : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पेण तालुका भाजपच्या वतीने बंगला वाडी, महल मिर्‍या डोंगर आदिवासीवाडी येथे वृक्ष लागवड आणि फळवाटप करण्यात आले.या कार्यक्रमास भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा चिटणीस वासुदेव म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवाजी पाटील, कामगार सेल तालुका अध्यक्ष प्रकाश कदम, भाजप तालुका सरचिटणीस रुपेश पाटील, युवा मोर्चा तालुका चिटणीस महेश भिकावले, पूर्व विभाग प्रमुख घोडिंदे जोशी, सोनार आदी उपस्थित होते. सेवा सप्ताह अंतर्गत 18 ते 25 सप्टेंबर या कालावधीत पेण शहर व तालुक्यासह ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत, तसेच रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी या वेळी सांगितले.

माणगावमध्ये वृद्धाश्रमात फळवाटप

माणगाव : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते वृद्धाश्रमात फळवाटप करण्यात आले. तालुक्यातील बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमातील वृद्धांना तसेच नगरपंचायत हद्दीतील वनवासी कल्याण आश्रम केंद्र उतेखोल येथे फळवाटप झाले. या कार्यक्रामास तालुकाध्यक्ष ढवळे यांच्यासह महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, अश्विनी महाडिक, बाबूराव चव्हाण, संजय जाधव आदी उपस्थित होते.

कर्जतमध्ये शिक्षण व स्वच्छतेसंदर्भात जनजागृती

कडाव : प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहर भाजपच्या वतीने नगर परिषद हद्दीतील दहिवली पेट्रोलपंप येथील आदिवासीवाडीत बेटी पढाओ बेटी बचाओ अभियान, तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. या वेळी फळवाटपही करण्यात आले. भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सरस्वती चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर शितोळे, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, विशाल कोकरे आदी पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उपस्थित मुलींना हेअर पिन, हेअर बॅण्ड, रबर बॅण्ड यांचेही वाटप करण्यात आले. या वेळी आदिवासींनी समाधान व्यक्त केले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply