पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समम्या जाणून त्या सोडविण्याचे तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 7) करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा या गल्लीमध्ये पाच साोसायट्यांमध्ये असून, या ठिकाणच्या नागरिकांच्या रस्त्यासंदर्भात अनेक समस्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवक निधीमधून पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामांचे नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, नंदा ओझे, शरद सोमण, योगेश जोगळेकर, अनिमेष पटवर्धन, दशरथ चोरघे, श्री निजमपुरकर, तुषार कप्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पनवेल महापालिका हद्दीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेवकांच्या माध्यमातून सोमवारी (दि. 7) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवकांच्या माध्यमातून आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून वाणी आळी, सोसायटी, लक्ष्मी वसाहत, कोळीवाडा, मिरची गल्ली येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, कार्यकर्ते चंद्रकांत मंजुळे, अधिकारी महेंद्र भोईर, मानसी शेट्टे, कामटे साहेब, कुणाल साळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नगरसेविका दर्शना भोईर यांनी सांगितले की, पावसाळ्याला सुरुवात होण्या आगोदर ही कामे पुर्ण करणार असून, नागरिकांनी आपल्या तक्रारी आमच्यापर्यंत्त पोहचवाव्यात. त्या त्या समस्यांचे निराकरण आम्ही करू.