माणगांव : प्रतिनिधी
माणगांवमध्ये झालेला रॉबरीचा गुन्हा माणगांव पोलिसांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये फिर्यादी आरोपी असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम प्रभाकर पारावे (वय 21 वर्षे, धंदा नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) हा यशगौरव कार्पोरेशन, तळेगाव, ता. माणगाव यांचे राईस मिलचे पैसे कलेक्शन करणेकरीता म्हसळा येथील व्यापारी, दुकानदार यांचेकडे गेला असता त्यास 31 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वा. चे सुमारास मोर्चा घाटामध्ये त्यांचे ताब्यातील अँटिव्हा स्कुटरवर जात असताना त्याचे मागुन अचानक एक पांढर्या रंगाची मारूती गाडी नंबर नसलेली यावरील चालकाने स्कुटीला ओव्हरटेक करून, स्कुटीला आडवी लावून थांबविली व कारमधून अनोळखी तीन लोक उतरल. त्याचे पाठीवर असलेली लाल व निळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये असलेले 5,57,339/- रोख रकमेसह जबरदस्तीने खेचून चोरी करून पळून गेले याबाबत प्रथम प्रभाकर पारावे याने तक्रार दिली होती.
गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात तपास सुरू केला होता. हा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणी सिसिटीव्ही व तांत्रिक तपास करीत असताना पोलिसांना हा फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे याचेबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे त्यास विश्वासात घेवुन तपास केला असता तो फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे (वय 21 वर्षे, धंदा- नोकरी रा. चिंचवलीवाडी, पो. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) याने लालसेपाटी व गाडी खरेदी करण्याची असल्याने या गुन्ह्याचा बनाव केलेबाबत सांगितले. या गुन्हयामध्ये चोरीस गेलेली रक्कम 5,57,299 /- रू सदर फिर्यादी प्रथम प्रभाकर पारावे याचेकडुन हस्तगत करणेत आलेली आहे. याबाबत पुढील कार्यवाही माणगाव पोलीस करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सतिष आस्वर, नितीन मोहीते, नवनाथ लहांगे, पो उप निरीक्षक अस्मिता पाटील, विक्रांत फडतरे, किर्तीकुमार गायकवाड, स. फौ. किशोर कुवेसकर, पो. हवा. किरण तुणतुणे, मिलींद खिरीट, पो. शि. रामनाथ डोईफोडे, शामसुंदर शिंदे, संतोष सगरे यांनी केली आहे.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …