Breaking News

महाडमध्ये 10 वर्षे अत्याचार करणार्‍यांवर दोन वर्षांनी गुन्हा दाखल

महाड : प्रतिनिधी

विवाहितेवर हुंड्यासाठी गेली दहा वर्षे अत्याचार करणार्‍या सासरच्या लोकांविरोधात पीडित महिलेने सन 2020मध्ये तक्रार केली होती, त्यांच्यावर गुरुवारी (दि. 3) महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेचा विवाह 13 मार्च 2010 रोजी विनेश सुदाम गायकवाड (रा. काकरतळे, महाड) याच्याशी रितीरीवाजाप्रमाणे झाला होता. नवरदेवाला मुलीच्या वडिलांनी सोन्याची चैन, ब्रेसलेट आणि सोन्याचे बिस्कीट दिले होते. तरीही ठरल्याप्रमाणे पन्नास हजार रुपये देण्यासाठी पती विनेश व साधना सुदाम गायकवाड, विद्या संतोष जाधव, संतोष जाधव यांनी सदर पीडित महिलेच्या वडिलांकडे तगादा लावला होता. तसेच विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. आरोपी संतोष जाधव याने गैरवर्तन करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. या विरोधात सदर विवाहित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर गुरुवारी  महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भादवी कलम 498 अ, 354 अ, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply