नऊ जणांचा मृत्यू; 285 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 22) कोरोनाचे 252 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 285 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 194 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 207 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 58 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 78 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल यशोपुरम वसंत सोसायटी, नवीन पनवेल श्री गणेश सोसायटी, खांदा कॉलनी हावरे वृंदावन सोसायटी, कामोठे सरोवर बिल्डिंग, आदित्य कॉम्प्लेक्स, टीना अपार्टमेंट, कळंबोली घर नं. 303 वळवली, खारघर सेक्टर 15 स्पेगेटी प्राईम रोज आणि सेक्टर 19 इन टॉप टॉवर येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2799 झाली आहे. कामोठ्यात 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3718 झाली आहे. खारघरमध्ये 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 3493 झाली.
नवीन पनवेलमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3122 झाली आहे. पनवेलमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3038 झाली आहे. तळोजामध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 716 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 16,886 रुग्ण झाले असून 14,399 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.27 टक्के आहे. 2107 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 380 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात नऊ जणांना संसर्ग
उरण ः उरण तालुक्यात मंगळवारी (दि. 22) नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच एका रुग्णाचा मृत्यू व 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळेलेल्या रुग्णांमध्ये माणकेश्वर कॉलनी केगाव, पाणदिवे कोप्रोली, श्री समर्थ आइस फॅक्टरी बोरी उरण, जेएनपीटी टाऊनशिप, जसखार, केगाव विनायक, गोवठणे, एकता निवास टाईप उरण, बोरी उरण येथील प्रत्येकी एक अशा एकूण नऊ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेल्या रुग्णांमध्ये जासई तीन, केगाव विनायक लक्ष्मी उरण, धुतूम, मधीलपाडा चिरनेर, विंधणे, पुनाडे, खोपटे, न्हावा शेवा पोलीस स्टेशन, साई प्रेरणा कॉलनी बोरी, जांभूळपाडा दिघोडे, उरण पोलीस स्टेशन, महाराष्ट्र संजीवनी क्लिनिक जासई, नागाव, वेश्वी, बोकडवीरा, सावरखार उरण प्रत्येकी एक अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर बोरी उरण येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1755 झाली आहे. त्यातील 1477 बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 191 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 87 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी महिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
महाडमध्ये 25 जणांना लागण
महाड ः महाडमध्ये मंगळवारी (दि. 22) कोरोनाचे 25 नवे रुग्ण आढळून आले असून, 30 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये हेरंबा पार्क दस्तुरीनाका, भावे, किंजळघर, काळभैरव नगर बिरवाडी, तुळजाभवानी कॉ. महाड, प्रभात कॉलनी, दस्तुरी नाका महाड, पिडीलाइट कॉलनी महाड, वसाप, बाजारपेठ महाड, विसावा, शेडाव नाका महाड, स्नेहनिर्माण शेडाव नाका महाड, तांबट आळी महाड, नांदगाव खु., मुठवली येथील व्यक्तींचा समावेश आहे. महाडमध्ये 132 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 1344 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1532 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जतमध्ये 15 जणांना बाधा
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात कोरोना खेड्यापाड्यात, वाडीवस्तीवर पसरला आहे. मंगळवारी (दि. 22) तालुक्यात नवीन 15 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 1497 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 1215 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 64वर पोहचली आहे.
कर्जत शहरात मुद्रे विभागात राहणार्या एका 58 वर्षांच्या व्यक्तीचा आणि एका 37 वर्षांच्या महिलेचा, भिसेगाव येथील एका 70 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीचा, दहिवली येथील एका 37 वर्षांच्या आणि एका 34 वर्षांच्या युवकाचा, कर्जत शहरातील एका 31 वर्षांच्या तरुणाचा, मोहिली येथील एका 54 वर्षांच्या व्यक्तीचा आणि एका 23 वर्षांच्या युवतीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे परिसरात भीती वाढली आहे.