Breaking News

रायगड जिल्ह्यात 507 नवे पॉझिटिव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 507 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 22) झाली, तर दिवसभरात 685 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 252,  अलिबाग 65, माणगाव 51, महाड 25, रोहा 16, कर्जत व पेण प्रत्येकी 15, पोलादपूर 14, खालापूर 13, मुरूड 11, म्हसळा 10, उरण नऊ, श्रीवर्धन आठ आणि सुधागड तालुक्यातील
तिघांचा समावेश आहे; तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात 10, अलिबाग दोन आणि उरण, खालापूर, पेण, मुरूड, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 42 हजार 465 आणि मृतांची संख्या 1133 झाली आहे. जिल्ह्यात 35 हजार 952 जण कोरोनामुक्त झाल्याने 5380 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply