
उरण : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती जासई विद्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, गाव अध्यक्ष यशवंत घरत, गोपीनाथ म्हात्रे, प्राचार्य अरुण घाग, उपमुख्याध्यापक श्री. खाडे, संघटनेचे अध्यक्ष नूरा शेख आणि सेवक वर्ग उपस्थित होता. कर्मवीर जयंतीनिमित्त विद्यालयात ऑनलाइन वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा पेन व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाइन चाचणीसाठी ज्या वर्गाची शंभर टक्के उपस्थिती होती अशा वर्गशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शेख यांनी केले, तर आभार ठाकूर मॅडम यांनी मानले.