Breaking News

‘ते’ बालक वात्सल्य ट्रस्टकडे

अलिबाग : प्रतिनिधी

रसायनीत फेकलेल्या नवजात बालकाला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व रसायनी पोलिसांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. नवजात अर्भकाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर कोणीतरी अज्ञाताने हे अर्भक फेकून दिले. हे अर्भक पुरुष जातीचे असून याबाबत रसायनी पोलिसांना एका महिलेने माहिती दिली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला ताब्यात घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. नवजात बालक कमी वजनाचे होते. रुग्णालयात आणले तेव्हा त्याला धाप लागली व पोटात रक्तस्राव झाला. बालकाला रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. बाळाची प्रकृती आता उत्तम आहे. डॉक्टर व परिचारिकांनी उत्तम काळजी घेतल्याने आज हे बालक जग पाहू शकले. बाळाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार डी. जी. देडे, पी. आर. जंगम यांनी 22 दिवस या बालकाची रुग्णालयात राहून काळजी घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ. एम. एस. क्षीरसागर, डॉ. आशिष पाटील, डॉ. मंजुश्री शिंदे, डॉ. सागर खेदु, डॉ. प्रीतम वरसोलकर, डॉ. पोटे व परिचारिकांनी बाळाची काळजी घेऊन त्याला नवीन जीवन दिले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply