उरण : वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्षा राणी सुरज म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप खोपटे व महिला आघाडी, खोपटे-उरण यांच्या माध्यमातून खोपटा येथे कापडी पिशव्यांचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या वेळी प्लास्टिक निर्मूलन जनजागृतीसाठी गावात कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये ह्या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी खोपटा सरपंच विशाखा ठाकूर, भाजप ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप ठाकूर, चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, महिला विभाग अध्यक्षा सुगंघा कोळी, ग्रामपंचायत सदस्य अचुत ठाकूर, खोपटा गाव महिला कमिटी अध्यक्ष कलावती घरत, ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदेश म्हात्रे, तसेच गावातील महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नाका कापडी पिशव्यांचा वापर करा प्रदूषण कमी करा, असे खोपटा सरपंच विशाखा ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.