Breaking News

उरण तालुक्यात पोषण आहार जनजागृती

उरण : वार्ताहर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियानांतर्गत सर्व देशभर महिला बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातून सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अंगणवाडी सेविकांनी गावांमध्ये पोषण आहार जनजागृती कार्यक्रमाला आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. 22) सुरुवात केली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातील महिलांना गरोदरपणात घ्यावयाची काळजी यांची माहिती देऊन, कुपोषण कमी करणे, माता व बाल मूत्यू रोखणे, किशोरवयीन मुला-मुलांना लैंगिक शिक्षण देणे या स्तरावर माहिती देऊन घरोघरी भेटी दिल्या, तसेच या बाबत महिलांना मार्गदर्शन आपल्या सहकार्‍यांच्या उपस्थित केले. एकंदरी महिला बालविकास आदिवासी विकास विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या या पोषण आहार जनजागृती अभियानाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही चिरनेर गावातील महिलांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिसून आले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply