माणगाव : प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्याचा मधूघट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शहरातील बालाजी मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या जागर स्त्रीशक्तीचा सन्मान हिरकणींचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. अक्षरा चव्हाण यांनी केले. कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात घरकाम करणार्या गीता पवार, व्यवसायिक रजनी मेथा, परिचारिका साधना सावंत, पहिल्या महिला सरपंच ज्योती बुटाला, डॉ. अक्षरा चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षिका नीलिमा वनारसे, माध्यमिक शिक्षिका दोशी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘तिच्यासाठी कविता‘ या विषयावर हनुमंतराव शिंदे, बाबुराव कांबळे, बाबाजी धोत्रे, सुशील अभंगे, संध्या दिवकर, डॉ. शीतल मालुसरे यांनी कविता सादर केल्या.
अक्षरा चव्हाण यांनी ‘वर्तमानातील स्त्री‘ या विषयावर तर अॅड. मराठे यांनी महिला संरक्षण विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अपूर्वा जंगम यांनी केले.
कोमसापचे जिल्हा समन्वयक अ. वि. जंगम, सुधीर शेठ यांच्यासह महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कोमसापच्या माणगाव अध्यक्षा सायराबानू चौगुले, रघुनाथ पोवार, रुपेश शेठ, मधुरा पालांडे, सिद्धेश लखमदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.