Breaking News

कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती करा; कर्जत भाजपची मागणी

कर्जत : बातमीदार

कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अजूनही प्रशासन महिला रुग्णाबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कर्जत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. कोविड सेंटरमधील महिलांची अत्याचारापासून बचाव आणि सुरक्षा होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात याबाबतीत निवेदन देण्यात आले.कर्जतमध्ये उपजिल्हा रुग्णालय कर्जत, रायगड हॉस्पिटल हे कोविड सेंटर आहेत. याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात. सध्या कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यात जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित महिला रुग्णांना उपचार करण्यासाठी दाखल केल्यावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासन घेत नाही असा भाजप महिला मोर्चाचा आरोप आहे. भाजप महिला मोर्चाचे वतीने कर्जत पोलिसांना निवेदन देत कोविड रुग्णालयातील महिला रुग्णांना प्रशासन सुरक्षा प्रशासन योग्य प्रकारे घेत नसल्यामुळेच त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यामुळेच झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी आणि महिलांची सुरक्षा जपण्यासाठी अशा कोविड सेंटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. तेथे 24 तास महिला कॉन्स्टेबलची नेमणूक असणे आणि रात्रीच्या वेळेस कोविड सेंटरमध्ये गस्त घालणे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.या समस्या गंभीरपणे घेणे गरजेचे असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करून महिला रुग्णांची इभ्रत धोक्यात आली आहे. यावर ताबडतोब यंत्रणा राबवून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्जत भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.हे निवेदन कर्जत पोलीस ठाणे यांना देण्यात आले, सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी भाजप महिला मोर्चाचे निवेदन स्वीकारले. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा स्नेहा सुनील गोगटे यांच्यासह गायत्री परांजपे, मनीषा अथनिकर, छाया कुलकर्णी, नगरसेविका विशाखा जिनघरे, नगरसेविका स्वामींनी मांजरे तसेच लीना गांगल, सरस्वती चौधरी, दीप्ती वाडकर, माजी नगरसेविका बिनीता घुमरे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply