Breaking News

नवीन पनवेलमध्ये आरोग्य मोहीम

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ओबीसी सेल कोकण प्रदेशचे उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी नवीन पनवेलमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा बुधवारी (दि. 23) या मोहिमेचा शुभारंभ करताना सांगितले. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त धेर्यशिल जाधव, ओबीसी सेल कोकण प्रदेश उपाध्यक्ष  अ‍ॅड. मनोज भुजबळ नगरसेवक, प्रभाग समिती ‘ड’ चे अध्यक्ष तेजस कांडपीळे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, महानगरपालिकेचे अधिकारी शैलेश गायकवाड, सदाशिव कवठे आणि अरुण कांबळे उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेने या मोहिमेसाठी 233 टीम नेमलेल्या असून सेवाभावी संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने स्वयंसेवक नेमले आहेत. या टीम घरोघरी जाऊन लोकांचा सर्वे करणार आहेत. त्यामध्ये नागरिकांची तपासणी करून ज्या नागरिकांना काही कोरोनाची लक्षणे आहेत त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा. असे आवाहन अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply