‘रुग्णोपयोगी साहित्य केंद्र रुग्णांसाठी आधार बनेल’; नेरळ येथे केंद्राचे उद्घाटन

खोपोली : प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने नेरळमध्ये नव्याने सुरू केलेले रुग्णोपयोगी साहित्य केंद्र हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार केंद्र बनेल, असा विश्वास नेरळमधील सुप्रसिद्ध डॉ. अश्विनी कर्वे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती गेली 49 वर्षे महाराष्ट्रामध्ये गरीब, गरजूंसाठी, वनवासी वाड्यांवर तसेच आपत्तीमध्ये अविरत सेवेचे कार्य करीत आहे. या समितीने नेरळमध्ये रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 13) करण्यात आले. त्यावेळी कै. बापूराव धारप सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. कर्वे बोलत होत्या. समितीचे जिल्हा कोषाध्यक्ष संजीव दातार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनकल्याण समितीचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून कुलाबा जिल्ह्यामध्ये नवीन 50 सेवा प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती समितीचे कुलाबा जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी प्रास्ताविकात दिली. रुग्णोपयोगी साहित्य केंद्र हे रुग्णाबरोबरच त्यांच्या कुटुंबियांशी जोडणारा दुवा ठरेल अशी आशा त्यांनी या वेळी व्यक्त केली.  महाराष्ट्र प्रांतामध्ये सात आयामांमध्ये सुरू असलेल्या जनकल्याण समितीच्या 1580 हून अधिक सेवा कार्यांची माहिती विस्ताराने माहिती समितीचे कोकण संभाग सहकार्यवाह आनंद राऊळ यांनी दिली. संघाचे कर्जत तालुका कार्यवाह संतोष देशमुख यांचेेही यावेळी समयोचित भाषण झाले. ऋचा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. समितीचे तालुका सहकार्यवाह श्रीहरी काळे, डॉ. अशोक कर्वे, विहिंपचे प्रखंड मंत्री ओंकार जोशी,आनंद काळे, महेश निगोजकर, बंडू काळे, केतन शिंदे, प्रयुश पारेख, अक्षय जोशी यांच्यासह नेरळमधील नागरिक  कार्यक्रमाला उपस्थित होते. ओंकार भडसावळे यांनी आभार मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामध्ये प्रमोद भडसावळे आणि रमेश कुलकर्णी सेवा देणार आहेत.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply