मास्क, सॅनिटायझर व औषधाचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व औषध वाटप करण्यात आले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर तसेच संतोषकुमार शर्मा, सुशील जोशी आदी उपस्थित होते. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले