पुणे : प्रतिनिधी
कोरोना या महाभयंकर आजारावर मात केलेल्या एका क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला. महेश उर्फ बाबू नलावडे असे या खेळाडूचे नाव असून, पुण्यातील जाधववाडी येथे बुधवारी (दि. 17) ही दुर्दैवी घटना घडली.
पुण्यातील जाधववाडी येथील मयूर चषक क्रिकेट स्पर्धेत ओझर आणि जांबुत या संघांमध्ये सामना सुरू होता. या सामन्यात ओझर संघाकडून फलंदाजी करणारा महेश उर्फ बाबू नलावडे हा मूळचे जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचा खेळाडू नॉन स्ट्रायकरला उभा होता. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. या वेळी त्याने खाली बसण्याचा प्रयत्न केला, पण तो कोसळला. महेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.
महेशने साडेतीन महिन्यांपूर्वी कोरोनावर मात केली होती. मुंबईत काम करणारा महेश गेल्या काही दिवसांपासून गावी घरातून वर्क फ्रॉम होम करीत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper