सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष
पनवेल : वार्ताहर – खांदा वसाहतीतील बालभारतीजवळील पनवेल-सीएसटी रेल्वे ट्रॅक खालील भुयारी मार्गावरील हाईटगेज शुक्रवारी तुटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी दिली.
बालभारती जवळून पनवेल सीएसटी रेल्वे मार्ग जातो. पनवेल- खांदा वसाहत रोड या ठिकाणाहून जातो. रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणाहून दुचाकी व चारचाकी वाहने जातात. खांदा वसाहतीतील सिग्नलपासून वळसा यामुळे घालावा लागत नाही. दरम्यान सबवेची हाईट कमी असल्याने. याठिकाणाहुन मोठे आणि अवजड वाहने नेता येत नाहीत. जर नजरचुकीने अशी मोठी वाहने आली तर ते भुयारी मार्गात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे येथे हाईटगेज बसवण्यात आले आहेत. ते मोडकळीस आले होते, तसेच जीर्ण झाले होते. हाईटगेज वाकल्याने ते कधीही पडून दुर्घटना होण्याची शक्यता नगरसेविका सीता पाटील यांनी व्यक्त केली होते. त्यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला होता. परंतु त्याबाबत कोणतीही खबरदारी किंवा कार्यवाही झाली नाही.
शुक्रवारी हे हाईटगेज तुटुन खाली पडले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. सिडको अशाप्रकारे खबरदारी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर येथे मजबूत नवे हाईट गेज बसावे, अशी मागणी नगरसेविका सीता पाटील यांनी केली आहे. दरम्यान, हाईटगेज रस्त्यावर पडल्याने हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला. वाहनचालकांना याबाबत माहिती नसल्याने ते याठिकाणी येत होते. त्यामुळे तेथून निघण्यासाठी संबंधितांना मोठी कसरत करावी लागली.