Tuesday , February 7 2023

खारघर-कोपरा पुलाच्या कामाची संयुक्त पाहणी

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

खारघर : प्रतिनिधी
जलवाहिनीच्या कामामुळे रखडलेल्या खारघर-कोपरा पुलाच्या कामाची भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 4) नवी मुंबई महापालिका आणि सिडकोचे अधिकारीर्‍यांसमवेत संयुक्त पाहणी केली. या वेळी यासाठी पाठपुरावा करणारे भाजप नगरसेवक व पदाधिकारीही उपस्थित होते.
सिडकोच्या नियोजनाप्रमाणे खारघर-कोपरा येथे नवीन पूल तयार करण्यात आला होता, परंतु नवी मुंबई महापालिकेच्या मोर्बे धरणाची पाईपलाईन या पुलाच्या प्रवाहात असल्याने पाण्याला अडथळा येत होता. म्हणून सिडकोने 2013पासून नवी मुंबईपालिकेकडे या पाईप लाईनचा मार्ग बदलण्याची विनंती केली होती, पण प्रशासनाकडून हा विषय दुर्लक्षित होता. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी यांना नवी मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 15 डिसेंबर 2019 रोजी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री. मिसाळ व शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी तत्काळ ही पाईप लाईन स्थलांतरीत करून जमिनींतर्गत करण्याचे व अधिकार्‍यांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता पडघम, खाडे, तर सिडकोतर्फे वरिष्ठ नियोजनकार मानकर, खारघरचे अधीक्षक अभियंता देशमुख, कार्यकारी अभियंता संजय पुडाळे व वाहतूक उपकार्यकारी अभियंता खुसनुरे यांनी या जागेची पाहणी केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा उपस्थित राहुन सध्या अस्तित्वात असलेले दोन पूल लवकरात काढून सिडकोने नियोजन केल्याप्रमाणे ही जागा विकसित करून से. 11 व 15ला खारघर-कोपरा येथे जोडमार्ग तयार करण्यासंदर्भात सांगितले.
या पाहणी दौर्‍यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘अ‘ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अ‍ॅड. नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, अनिता पाटील, संजना कदम, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, किर्ती नवघरे, वासुदेव पाटील, दीपक शिंदे, साधना पवार, समीर कदम, दत्ताशेठ वर्तेकर, दिलीप जाधव, अनिल साबणे, संतोष शर्मा, विलास निकम, शुभम आदी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply