Breaking News

गरम पाणी शरीरासाठी लाभदायक

आरोग्य प्रहर

पाणी शरीरासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. सकाळी उठल्यानंतर दररोज एक ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामुळे तुम्ही ताजेतवाणे होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे, मात्र गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. आयुर्वेदातदेखील गरम पाणी पिण्याचे अनेक लाभ सांगितले आहेत.

* जर आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल, तर गरम पाणी पिणे कधीही चांगले ठरते. तसेच वजन कमी करण्यासाठीही गरम पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

* तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. साधी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.

* महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखत असेल तर थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोटदुखीवर आराम मिळतो.

* गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्ध पाणी दूर होते. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध तत्त्वे घामातून बाहेर पडण्यास मदत होते.

* गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्ध पाणी बाहेर पडते. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.

* वजन घटविण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिसळून प्यायलास लाभदायक ठरते.

* गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्या वाढीसाठी गरम पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

* गरम पाणी पिण्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते किंवा गॅस निर्माण होत नाही.

* गरम पाणी पिण्यामुळे कफ ाचा त्रास कमी होतो. गरम पाणी पित्तावरही गुणकारी आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply