Breaking News

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्यातर्फे शिवाजीनगर येथे मास्कचे वाटप

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रभाग 17चे नगरसेवक अड मनोज भुजबळ यांनी शिवाजी नगर झोपडपटीतील नागरिकांना शुक्रवारी (दि. 19) महापालिकेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे वेळी दोन हजार मोफत फेस मास्कचे वाटप केले.

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हजाराचा टप्पा पार करून गेली आहे. नवीन पनवेल आणि पनवेलमध्ये अडीचेशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या प्रभाग 17 मध्ये नवीन पनवेल आणि पनवेल एसटी स्थानका मागील शिवाजीनगर  झोपडपट्टी, मालधक्का हा परिसर येतो. शिवाजीनगर झोपडपट्टीत दोन कुटुंबातील 13 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने येथील सावित्रीबाई फुले बाल विकास मंदिरात  महापालिकेतर्फे शुक्रवारी आरोग्य तपासाणीचे शिबिर घेण्यात आले. त्यावेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी तेथील नागरिकांना स्वखर्चाने दोन हजार फेस मास्कचे वाटप केले.            या वेळी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपायक्त संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघूलकर उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी शिवाजीनगर झोपडपट्टीत 13 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत येथे 367 झोपड्या असून त्यामध्ये राहणारे नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात त्यामुळे खबरदारी घेण्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात येत असल्याचे सांगून नागरिकांनी कोणाला कोरोनाची लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता ताबडतोब  महापालिकच्या आरोग्य विभागात येऊन उपचार घ्यावेत आणि बाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply