उरण : वार्ताहर – भारताचे प्रमुख कंटेनर पोर्टने असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीची सामग्री घेऊन आलेल्या ‘एमव्ही पायोनियर ड्रीम’ जहाजाची यशस्वीपणे हाताळणी केली.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईला जेएनपीटी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडले जाईल, तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी सुद्धा कनेक्टिविटी उपलब्ध होईल. जेएनपीटीसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे कारण ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातून नवी मुंबई ते मुंबईची दरम्यान निर्माण होणारी कनेक्टिविटी मुंबई आणि उपनगरांच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.
जेएनपीटी ने 23 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या शॅलो वाटर बर्थवर 1033 मे.टन वजनाचे कॉलम, सपोर्टिंग स्ट्रक्चर आणि गर्डर्स – पूल बांधण्यासाठी वापरल्या जाणारे कंपाऊंड स्ट्रक्चर; असलेली 84 पॅकेजेसचे 35.30 तासांच्या विक्रमी कालावधीत हाताळणी केली. हाय फोन्ग बंदरामधून लोड केलेली ही सामग्री एल आणि टी – आयएचआयच्या कंसोर्टीयमद्वारे आयात केली होती. एमएमआरडीएने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठीचे (पॅकेज -1) शिवडी इंटरचेंज सहित मुंबई खाडीमध्ये 10.380 किलोमीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामाचे कार्य एल एंड टी आणि आयएचआय कंसोर्टीयमला दिले आहे. फॅब्रिकेटेड ऑर्थोट्रॉपिक स्टील गर्डर्स प्राप्त झाल्याने, बांधकाम कार्य वेगाने होईल व साइटवर डेकशी संबंधित कार्य कमी होईल. ही सामग्री आयात करण्यासाठी मेसर्स संसारा शिपिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एजंट होते तर मेसर्स बीडीपी इंटरनॅशनलने लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता.
मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशातील सर्वांत लांब समुद्री पूल असेल. नवी मुंबईतील न्हावा-शेवा येथील जेएनपीटीला मुंबईतील शिवडीशी जोडणा-या 22 किलोमीटर लांबीच्या या पुलासाठी 10000 हून अधिक गर्डरचा वापर केला जाणार आहे आणि त्यातील सुमारे 16.5 कि.मी. लांबीचा हिस्सा हा समुद्रात असेल तर उर्वरित हिस्सा जमिनीवर असेल. हा पुल तयार झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत अत्यंत कमी वेळेत पोहचता येईल.
जेएनपीटी ने अशाप्रकारे मालवाहतूक करून स्वतःला देशातील व्यापार आणि उद्योगासाठी मुख्य उत्प्रेरक असल्याचे सिद्ध केले आहे तसेच हे सुद्धा दाखवून दिले आहे की देशाच्या विकासाठी अखंडित सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.