Breaking News

उरणमध्ये रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

उरण ः प्रतिनिधी

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 16) रायगड  जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यांतील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत या केंद्रावर बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येतील. या मोहिमेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात येतील.

उरण शहरात 13 ठिकाणी पल्स पोलिओ बूथ ठेवण्यात आले असून, एक मोबाइल बूथही ठेवण्यात आले आहे, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली. उरण शहराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उरण आरोग्य केंद्राने जय्यत तयारी केली आहे. डोस घेण्यापासून कोणतेही बाळ वंचित राहू नये याकरिता सोमवार (दि. 17) ते शुक्रवार (दि. 21) घरोघरी जाऊन बाळांना डोस देण्यात येतील, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली. उरण शहरात मोरा बंदर, दत्त मंदिर, उरण नगरपरिषद शाळा क्र. 3, भवरा साल्ट ऑफिस, मांगीरदेव समाजमंदिर, बोरी पार, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, एन. आय. शाळा, सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळा, कोंकण ज्ञानपीठ कॉलेज, उरण बौधवाडा समाज मंदिर, कोटगाव मिठागर कार्यालय, उरण चारफाटा जकात चौकी, उरण बस डेपो आदी ठिकाणी बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे पल्स पोलिओ पर्यवेक्षक मोहन जगताप यांनी दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply