Breaking News

पतीच्या निधनानंतर आठवडाभरात पत्नीचाही मृत्यू

कर्जत : बातमीदार – आंबेडकरी चळवळीत काम करणारे नेरळ येथील कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर दोन आठवड्यांतच त्यांच्या पत्नी कलावती यांचीही कोरोनाच्या संसर्गाने जीवनयात्रा संपली. या घटनेने जाधव कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे.

लक्ष्मण जाधव यांचे 13 सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेे. निधनानंतर त्यांचे विधीकार्य बाकी असताना त्यांच्या पत्नी कलावती यांना कोरोनाचा संसर्ग झाला. जाधव दाम्पत्याचे दोन्ही पुत्र श्रावण आणि राहुल यांनी आईला बदलापूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती साथ देत नसल्याने कलावती यांना कल्याण येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र 30 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर पत्नीचे निधन झाल्याने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply