14 जणांचा मृत्यू; 189 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 3) कोरोनाचे 263 नवीन रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 189 रुग्ण बरे झाले. महापालिका हद्दीत दिवसभरात 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 129 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 रुग्ण बरे आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल कृष्णकुंज सोसायटी, नवी पनवेल सेक्टर 5 ए हरीमहल सोसायटी, सेक्टर 9 हावरे वृंदावन सोसायटी, सेक्टर 18 श्री अष्टविनायक अपार्टमेंट, कळंबोली सेक्टर 4 साईनगर सोसायटी, कळंबोली गाव घर नंबर 92, कामोठे सेक्टर 14 श्री कॉम्प्लेक्स, श्री सद्गुरू कृपा जुई गाव, सेक्टर 16 चायनीज स्टार, सेक्टर 6ए जुई अपार्टमेंट आणि खारघर सेक्टर 30 ओवे गाव लक्ष्मण शेठ चाळ येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3166 झाली आहे. कामोठेमध्ये 72 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4422 झाली आहे. खारघरमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4402 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 30 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3721 झाली आहे. पनवेलमध्ये 18 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3468 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 794 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 19973 रुग्ण झाले असून 17612 रुग्ण बरे झाले आहेत. 1914 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 447 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात सात नवे रुग्ण
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात शनिवारी सात नवे कोरोना रुग्ण आढळले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये फुंडे दोन, दिघोडे दोन, वारीक आळी नागाव, दिघोडे, दादरपाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1902 झाली आहे. त्यातील 1644 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 161 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
कर्जतमध्ये पाच कोरोना पॉझिटिव्ह; दोन जणांचा मृत्यू
कर्जत : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. तालुक्यात शनिवारी नवीन पाच रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत 1657 रुग्ण आढळले असून 1474 रुग्ण कोरोनावर मात करून घरी आले आहेत. तर 103 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 80 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये मुद्रे बुद्रुक विभाग व माथेरान येथे प्रत्येकी दोन, कर्जत शहर येथे एकाचा समावेश आहे.